पुणे: राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे (Pune) शहरातील नाट्यगृहे, चित्रपटगृहे गेल्या काही महिन्यांपासून बंद होती. मात्र, आता कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने पुन्हा नाट्यगृह व चित्रपट गृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. येत्या १ डिसेंबरपासून कोरोना नियमात शिथिलता आणत शहरतील सर्व चित्रपटगृहे, सांस्कृतिक केंद्रे पूर्ण क्षमेतेने सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहिल.
पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत असताना सर्वकाही सुरळीत चालेले असल्याचे दिसून आले आहे. आज आढावा बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमाशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून चित्रपटगृहे व नाट्यगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असल्याची अजित पवार यांनी स्पष्ट केले. कोरोनाची दुसरी लात ओसारल्यानंतर टप्प्या-टप्प्याने सर्वकाही सुरू करण्यात येत होतं.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील सर्व चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे १००% खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षांच्या विरामानंतर उभी राहत असलेल्या मराठी मनोरंजनसृष्टीला या निर्णयामुळे भरारी मिळेल असा मला विश्वास आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 27, 2021
या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून पुणेकरांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील सर्व चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे १००% खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षांच्या विरामानंतर उभी राहत असलेल्या मराठी मनोरंजनसृष्टीला या निर्णयामुळे भरारी मिळेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. समस्त पुणेकर आणि पुणे महानगरपालिका यांनी एकमेकांच्या साथीने दिलेल्या लढ्याचेच हे यश म्हणायला हवे. पुण्याने महाराष्ट्र आणि एकूणच भारतासमोर कोरोनामुक्तीचा आदर्श ठेवला आहे, यापुढे देखील सर्व आवश्यक निर्बंध पाळून पुणेकर सर्व कलाविष्कारांचा आस्वाद घेतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- नव्या व्हेरिएंटचा धोका; एकनाथ शिंदेंनी दिल्या प्रशासनाला ‘या’ सूचना
- ‘मी अनकम्फर्टेबल होतो’ म्हणत सुनील शेट्टीच्या मुलाने सांगीतला ‘तो’ अनुभव !
- ‘किरीट सोमय्या यांना महत्व देण्याची गरज नाही’
- २४ महिन्यांतील मविआचे १०० घोटाळे, किरीट सोमय्यांनी केले उघड
- ‘या’ दोन सुपरस्टारसोबत रोहित शेट्टी करणार का काम?


