🕒 1 min read
मुंबई – पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची लोकसभेवर निवड झाल्यामुळे ते पद रिक्त झाले होते. आता पुण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचवेळी जळगावचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Interaction with media on State Level Kharif Review meeting in Mumbai https://t.co/6qjCP5XdeN
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 7, 2019
पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आपल्याकडे यावी, यासाठी शहरातील अनेक आमदारांनी तसे प्रयत्नही सुरू केले होते. अनेक आमदारांची नावे चर्चेत होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. या चार महिन्यांसाठी पुण्यातून नाव दिले तर एका आमदाराच्या पारड्यात झुकते माप दिल्यास रुसवे फुगवे होऊ शकतात. अशातच गटातटाचे राजकारण निर्माण होऊ शकते, अशी शक्यता धरून शहरातून पालकमंत्री न देताना बाहेरील जिल्ह्यातील मंत्र्यास पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
