🕒 1 min read
मुंबई : अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट झाल्यानंतर अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान वापरण्यात आले. या मध्यमातून १२९ भारतीयांना परत आणले गेले आहे. मात्र, अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि घाबरलेले भारतीय नागरिक यांना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरुप भारतात आणले आहे. या ‘क्रू मेंबर’मध्ये अमरावती जिल्ह्यातील श्वेता शंकेचाही समावेश होता. श्वेताच्या या कामगिरीचे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कौतूक केले आहे.
या संदर्भात श्वेताचा फोटो शेअर करत चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ते म्हणतात की, ‘एअर इंडिया येथे विमान परिचारिका म्हणून कार्यरत असणारी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील श्वेता शंके हिने अफगाणिस्तान येथे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत १२९ भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. आपल्या जीवाची पर्वा न करता तिने सर्व प्रवाशांना मार्गदर्शन करत सुखरूप मायदेशी आणले. श्वेताच्या या शौर्याचा आम्हाला अभिमान आहे. जिजाऊच्या या लेकीचे मनःपूर्वक अभिनंदन!’
एअर इंडिया येथे विमान परिचारिका म्हणून कार्यरत असणारी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील श्वेता शंके हिने अफगाणिस्तान येथे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत १२९ भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. pic.twitter.com/fnPcfcvUq1
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 18, 2021
काबूल विमानतळ सध्या जरी अमेरिकेच्या सैनिकाच्या ताब्यात असले तरी तालिबाणींचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत काबूलमध्ये विमान उतरवणे आणि सुखरुप मायदेशी परत येणे जिकरीचे काम आहे. यात सर्व प्रवाशांना शांत ठेवत स्वत:चा जीव धोक्यात घालून एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी यशस्वी पार पाडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबान्यांना धक्का ; उपराष्ट्रपति अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला कार्यकारी राष्ट्रपती म्हणून केलं घोषित
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- योगी सरकारकडून पुन्हा एक नामकरण; आता ‘अलीगढ’ होणार ‘हरिगड’
- राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? ‘सामनातून’ टीका
- ‘दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा डेल्टा प्लसचा संसर्ग झाला ही बाब सत्य’; टास्क फोर्स प्रमुखांची कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
