औरंगाबाद : शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा खुर्चीचा मोह सुटता सुटेना. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या मराठवाड्यातील आमदार-खासदार यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांची बैठकीत खासदार नसतानाही चंद्रकांत खैरे यांनी हजेरी लावली. एवढेच नव्हे तर, विद्यामान खासदार इम्तियाज जलील यांच्या यांची खर्चीवर स्वत: बसले. यामूळे खासदार इम्तियाज जलील यांना दुसऱ्या खुर्चीवर बसावे लागले. यामूळे पुन्हा एकदा खैरे यांचा खुर्चीचा मोह समोर आला आहे.
खासदार इम्तियाज जलील, म्हणाले, विभागीय आयुक्त कार्यालयात आमदार – खासदार कुठे बसणार यांचे नियोजन करण्यात आले होते. आजच्या बैठकीसाठी नेमप्लेट लिहलेल्या होत्या. आज माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनाही गेल्या वीस वर्षांपासून खासदाराच्या खुर्चीवर बसण्याची सवय झाली आहे. सवय सुटत नाही. ते थेट माझ्या खुर्चीवर येऊन बसले. मला दुर बसावे लागले.
मला दुष्टीने खुर्चीसाठी महत्वाची ठरत नाही. मला खुर्ची पेक्षा माझे मुद्दे महत्वाचे होते. यावेळी मी मांडलेले मुद्दे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. मी खुर्चीच्या मागे पळत नाही. त्यामूळेच मला खासदारकीची खुर्ची मिळाली असल्याचे ही खासदार जलील म्हणाले.
संसदे किंवा विधीमंडळाचे सदस्य नसताना अशोक स्तंभाचे चित्र वापरता येत नाही. असे असतानाही गेल्या वीस वर्षांपासून खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांनी आपल्या निमंत्रण पत्रिकेवर अशोक स्तंभाचा वापर करीत आहे. हा वापर गैर असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची निमंत्रण पत्रिकेवर हा अशोक स्तंभ वापरला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यासाठी हा अशोक स्तंभ वापरला आहे. यामूळे त्यांच्यावर कारवाई होणार किंवा नाही याकडेच आता लक्ष लागून आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

