पुणे : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
कोरोनाकाळानंतर राज्यातील ही पहिलीच निवडणूक असल्यानं सर्वांचं लक्ष्य या निवडणुकांकडे लागलं असतानाच राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील वेग घेऊन लागले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केल्यानंतर राष्ट्रवादीने देखील हल्लाबोल केला आहे.
‘राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,’ अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यानंतर राष्ट्रवादीसह महाविकास गाडीतील पक्ष आक्रमक झाल्यानंतर शरद पवार यांचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र तुम्ही मोदींवर, अमित शाहांवर बोललेले चालते. तुमचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का? असा प्रतिसवाल करत करत चंद्रकात पाटील यांनी आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिलं.
यासर्व टीका सत्रावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी देखील भाष्य केलं आहे. ‘देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी कधी टरबुज्या म्हणत नाही. चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे. त्यांनी राग मानून घेऊ नये,’ असा चिमटा जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटील यांचा काढला आहे. त्यामुळे राजकारणातील दोन पाटलांसह दोन प्रदेशाध्यक्ष आमने-सामने आल्याचं चित्र आता निर्माण झालं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आश्रम मधील जपनाम वाला भुपा आणि साहेबांवर टिका करणारा (भा)जपनामवाला गोपा सारखेच’
- आता राज्यपाल सुद्धा पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील; जयंत पाटलांचा टोला
- अनोळखी नंबर ओळखण्यासाठी गूगल लवकरच आणणार नवीन अॅप
- मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही, अनिल परबांचा खळबळजनक आरोप
- नक्की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? अजित पवार की उद्धव ठाकरे?; आंबेडकरांचा खोचक सवाल


