औरंगाबाद: एएसआर इंडस्ट्रीज मसिआ प्रिमियर लीग’मध्ये रविवारी (६ मार्च) रोजी झालेल्या अंतिम सामन्यात चंद्रा मीडिया इलेव्हन संघाने किर्दक चार्जर्स संघाला पराभूत करत १५ धावांनी विजय मिळवला आहे. पोलिस अधिक्षक निमित गोयल यांच्या हस्ते विजेत्या संघाचे बक्षीस वितरण करण्यात आले. ‘एमपीएल’चे सामने सिडको, एन. दोन येथील औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर खेळवण्यात आले.
एमपीएलच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत चंद्रा मीडिया इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. २० ओव्हरमध्ये चंद्रा मीडिया संघाने ९ बाद १४९ धावा केल्या. ज्यात अमोल म्हस्के या फलंदाजाने सात चौकारांच्या मदतीने ४२ चेंडूत धमाकेदार ५१ धावांचे अर्धशतक ठोठावले. तसेच चंद्रा मीडियाकडून विजय भुजाडी यांनी ३६ तर, दुर्गेश जोशी यांनी २० धावांची खेळी केली. किर्दक चार्जर्सच्या गोलंदाजीत पांडुरंग धांडे आणि प्रदीप चव्हाण यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
चंद्रा मीडियाने (chandra media XI) दिलेल्या १४९ धावांचा पाठलाग करताना किर्दक चार्जर्स (kirdark chargers) १९.३ ओव्हरमध्येच १३४ धावांवर सर्वबाद झाला. चार्जर्सकडून प्रदीप चव्हाण यांनी ४२ चेंडूत ४२ धावा, बाळासाहेब मगर यांनी दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १७ चेंडूत ३० धावा तर, प्रदीप निकम यांनी २० धावा केल्या. तर चंद्रा मीडियाकडून गोलंदाजी करताना संभाजी कुटे यांनी चार ओव्हरमध्ये २५ धावा देत चार विकेट्स घेतल्या. याच्या व्यतिरिक्त विजय अहिरे यांनी ३.३ ओव्हरमध्ये तीन तर, किरण बदडे यांनी दोन गडी बाद केले. आपल्या धुव्वादार कामगिरीने चंद्रा मीडियाने १५ धावांनी विजय मिळवत एमपीएल (MPL 2022) वर आपले नाव कोरले. तसेच अंतिम सामन्यात संभाजी कुटे सामनावीर ठरला.
एमपीएल स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी पोलिस अधिक्षक निमित गोयल यांच्यासह प्रमुख पाहुणे एएसआर इंडस्ट्रीजचे श्रीधर नवघरे, एमएसईबीचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, मसिआ अध्यक्ष नारायण पवार, क्रीडा समिती प्रमुख मंगेश निटुरकर उपस्थित होते. तसेच सामन्याचे सुत्रसंचालन इब्राहिम सय्यद यांनी केले. स्पर्धेसाठी मंगेश निटुरकर, राहुल घोगरे, अमित राजळे, संदीप पाटील, मनिष अग्रवाल, कमलाकर पाटील, राजेंद्र मगर यांनी पुढाकार घेतला तर राहुल मोगले, संजय खिल्लारे यांच्या सहकार्याने स्पर्धा पार पडली.
महत्वाच्या बातम्या
- “नवाब मलिक समोर येतील तेव्हा…”, न्यायालयाच्या सुनावणीनंतर मलिक कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया
- राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात BAMU मध्ये निषेधाचा ठराव मंजूर
- कुलदीपच्या कारकिर्दीतील अंधार संपेना; अक्षरच्या पुरागमनाने कसोटी संघातून हकालपट्टी
- शेतकऱ्याने स्वतः घरीच बनविले जैविक कीटकनाशक; आर्थिक खर्चापासून केली सुटका!
- गौतम गंभीरने अश्विनची तुलना केली ‘या’ महान भारतीय दिग्गजाशी, म्हणाला…

