परभणी : पुढील तीन दिवस उस्मानाबाद, लातूर तसेच नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान विभाग प्रमुख प्रा. डॉ. कैलास डाखोरे यांनी सोमवारी दिली आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये तसेच संपूर्ण मराठवाड्यात ८ मेपर्यंत वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज यापूर्वी देखील वर्तवला होता. त्यानुसार मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी देखील लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच पशुधनाचे नुकसान झाले आहे. ७ मेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून मिळालेल्या अंदाजानुसार मंगळवारी (दि. ४) मे रोजी मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर तसेच नांदेड या तीन जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
६ मे ला पुन्हा उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक राहणार आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे. ७ मेला बीड, उस्मानाबाद, लातूर तसेच नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाटासह वाऱ्याचा वेग अधिक राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आगामी चार दिवसात शेतकऱ्यांनी तसेच नागरीकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. आशा परिस्थितीत घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. झाडाच्या आडोशाला उभे राहू नये. पशुधनास निवाऱ्याच्या जागी बांधावे, झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू किंवा मोकळे सोडू नये, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खासदार नवनीत राणा यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे रेमडेसिवीरची मागणी
- भाजपचा पराभव दिसणाऱ्यांनी मोतीबिंदूचे ऑपरेशन करावे
- मोठी बातमी : आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, आज होणारा कोलकाता विरुद्ध बँगलोर सामना रद्ध
- मराठवाडयात निवडणूक बूथनिहाय लसीकरण केंद्र उभारण्याची आपची मागणी
- मोठी बातमी! आज होणारा आरसीबी विरुद्ध केकेआर संघाचा सामना पुढे ढकलला


