Share

आज पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतात सुद्धा ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याचवेळी पंतप्रधानांनी २० एप्रिल नंतर काही शहरात लॉकडाऊन स्थितील करण्याचे संकेत दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीत कोरोना विषाणू तसेच लॉकडाऊन संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नियमावलीनुसार, सर्व आंतरराज्यीय विमानवाहतूक, ट्रेन (पॅसेंजर), सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक आणि कमर्शियल कामे, हॉटेल, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, चित्रपटगृहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, बार, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहे. या नियमावलीमध्ये हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो, सब यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यासोबतच केंद्र सरकारने या नियमावलीमधून रुग्णालये, शेती, ऑनलाईन टीचिंग, किराणा दुकान, मासेमारी या सर्वांना सवलती दिल्या आल्या आहेत. या सर्व सवलती ग्रामीण भागांत आणि हॉटस्पॉट्स नसलेल्या क्षेत्रांसाठी असतील. या सूचनांमध्ये ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मजूरांना जाण्या-येण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील कामगारांना या नियमातून वगळण्यात आले आहे. या सूचनांमध्ये कामगार काम करण्यासाठी येण्याजाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!