Share

भारत-चीन सीमा वादामध्ये केंद्र सरकारची भूमिका दुर्भाग्यपूर्ण – आप

Published On: 

पुणे : आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य युनिटतर्फे आज चीनद्वारा भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्याच्या विरोधामध्ये राज्यात ठिकठिकाणी आक्रोश निदर्शने केली. त्याचाच भाग म्हणून आज टिळक रोड, ग्राहक पेठजवळ सुद्धा चीन विरोधामध्ये आक्रोश निदर्शने केली गेली. यावेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत आणि चीन सीमा विवादाबाबत केंद्र सरकारची भूमिका ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. चीनच्या आक्रस्ताळेपणाच्या विरोधात आम आदमी पक्ष केंद्र सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा आहे परंतु केंद्रांमध्ये असलेल्या भाजप सरकारकडून काही प्रश्नांची उत्तरे भारतीय जनतेला अपेक्षित आहेत. भारत आणि चीन या सीमेवरती गेल्या काही दिवसांपासून झालेल्या घटनांमुळे संपूर्ण भारत देश आक्रोश करत आहे. यासारख्या अतिशय संवेदनशील आणि गंभीर मुद्द्यावर केंद्रातील भाजप सरकार देशातील जनतेशी खोटे का बोलत आहे ?

ते केवळ ‘फेकू’ नाही तर ‘घाबरट’सुद्धा, कन्हैय्या कुमारची मोदींवर टीका

दिल्लीमध्ये झालेल्या काल भारत-चीन सीमा विवादावर एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु त्यावेळी या सर्वपक्षीय बैठकीसाठी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न बोलावणे हे केंद्र सरकारच्या संकुचित मनोवृत्तीचे लक्षण आहे. या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘भारताच्या जमिनीत कोणी घुसखोरी केली नाही’ या वक्तव्यामुळे अजून काही नवीन प्रश्न तयार होत आहेत ज्याची उत्तरे सबंध भारत देशाला हवी आहेत. गेल्या बरेच दिवसांपासून भारत आणि चीन सीमा विवाद हा गरम झाला आहे, गंभीर झाला आहे. गेले दोन महिने अशा बातम्या येत आलेल्या आहेत की चीनने भारतीय जमिनीवर कब्जा केला आहे. त्याला घेऊन दोन्ही देशांच्या सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर तसेच विदेश मंत्री पातळीवर तातडीच्या चर्चा चालल्या आहेत. तरीदेखील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय सैन्याच्या 20 जवानांना, ज्याच्यामध्ये एका कमांडिंग ऑफिसरचा ही समावेश आहे, यांना वीरगती प्राप्त झाली. ही घटना कळताच संपूर्ण देशामध्ये आक्रोश माजला आहे. देशातील जनतेमध्ये प्रचंड राग आहे. लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. केंद्रातील भाजप सरकारच्या भूमिकेमुळे हे प्रश्न अजून वाढले आहेत. सुरुवातीला केंद्र सरकार म्हटले की आपले 3 जवान शहीद झाले आहेत. नंतर केंद्राने अशी बातमी दिली की 20 जवान शहीद झाले आहेत. कुठलेही भारतीय जवान चीनच्या ताब्यामध्ये नाहीत असंही केंद्र सरकारने सांगितलं होतं. परंतु काल मीडियाच्या माध्यमातून अशा बातम्या स्पष्टपणे समोर आल्या की भारताचे 10 जवान हे किमान गेले तीन दिवस चिनी सैन्याच्या ताब्यामध्ये होते. त्यांना बंदिवान बनवलं गेले होते आणि आता त्यांना सोडून चीन तर्फे सोडून देण्यात आले आहे. आता प्रधानमंत्री म्हणताहेत की चीन भारतीय सीमेच्या आत मध्ये घुसला नाही, भारतीय जमिनीवर चिनी सैन्याने कब्जा केला नाही. मग सीमेवर गेले दोन महिने इतका तणाव कशासाठी होता ? कशासाठी उच्चस्तरीय चर्चा झडत होत्या ? कशासाठी 20 जवान शहीद झाले ? कशासाठी 76 जवान जखमी झाले ? कशासाठी 10 जवानांना बंदी बनवलं गेलं ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भारतीय जनतेला केंद्र सरकारकडून हवी आहेत.

आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी असे सांगितले की हा एक संवेदनशील मुद्दा आहे. आम्ही शहीद झालेल्या जवानांना बद्दल कुठल्याही पद्धतीचे राजकारण करू इच्छित नाही. आम्ही भारतीय जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. 20 जवानांनी केलेल्या बलिदानाला असे व्यर्थ जाऊन देता कामा नये. त्यांच्या बलिदानाचा बदला भारताने चीनकडून घेतला पाहिजे. चीनला सडेतोड उत्तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले पाहिजे.

आम आदमी पक्षाचे शहर सहसंयोजक संदीप सोनवणे असे म्हणाले की आम आदमी पार्टी अशा पद्धतीने चीनला सडेतोड उत्तर देण्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार व नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभी आहे पण त्यांनी ठोस कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे.

आम आदमी पक्षाचे शहर संघटन मंत्री अभिजित मोरे यांनी अशी मागणी केली की ज्या भारतीय जमिनीवर चिनी कब्जा केलेली आहे ती जमीन भारत सरकारने चीनकडून पुन्हा प्राप्त करून घेतली पाहिजे आणि 1 एप्रिल 2020 पूर्वीची परिस्थिती भारत-चीन सीमेवर कायम केली पाहिजे. यावर कोणत्याही पद्धतीची तडजोड स्वीकार केली जाऊ नये.

सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न बोलावणे हे केंद्र सरकारच्या संकुचित मनोवृत्तीचे लक्षण आहे. अशा पद्धतीचा अहंकार,घृणा केंद्र सरकारने बाळगणे ही वाईट व गंभीर गोष्ट आहे. आम्ही या मनोवृत्तीचा निषेध करत आहोत.

गलवान खोऱ्यामध्ये शहीद झालेल्या 20 जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची सन्मान राशी दिली जावी अशी मागणी आम आदमी पक्षाने केली.

तसेच चीनशी होणाऱ्या या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या मालावर वाढीव आयात शुल्क लावण्यात यावे तसेच ही आयात कमीत कमी व्हावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना शक्य त्या प्रमाणामध्ये राबवल्या जाव्यात अशी मागणी आम आदमी पक्षाने केली.

‘पालकमंत्री या नात्याने मी कायमच ग्रामस्थांच्या पाठीशी’

यावेळेस शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आप चे मनोज थोरात, आनंद अंकुश, राजेंद्र वराडे, कपिल मोरे, संजय चिटणीस,प्रकाश गायकवाड, संदेश दिवेकर, मोहनसिंग रजपूत, सतीश यादव,सुरेश पारखी, अजिंक्य जगदाळे, गणेश वैराट, सुहास पवार, सुनील कांबळे,सैद अली, संदीप सोनवणे,अभिजित मोरे, मुकुंद किर्दत उपस्थित होते .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!