Share

जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन आणि वाहतुकीवर कुठलेही निर्बंध नसल्याचा केंद्र सरकारचा पुनरुच्चार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी कुठलेही निर्बंध नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. या वाहनांच्या वाहतुकीवर कुठलेही निर्बंध आणू नये असे आवाहन केंद्र सरकारने सर्व राज्यांना केले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक कामगारांना कामाच्या ठिकाणी जाताना कुठलेही अडथळे येणार नाही याचीही काळजी घेण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले असल्याची माहिती सह सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी राज्य सरकारांकडून प्रयत्न सुरू आहेत, असेही त्या म्हणाल्या.

देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांसोबत खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनाही या विषाणू संसर्गाची चाचणी करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एम्ससारख्या संस्थांना राज्यं वाटून दिले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. देशात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ६०० हून अधिक रुग्णालयांमध्ये १ लाखाहून अधिक बेड्स उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, केंद्र सरकारला करोना व्हायरसच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवायचे असून Covid-19 च्या चाचण्या व्यापक प्रमाणावर करायच्या आहेत. त्यादृष्टीने केंद्र सरकार योजना आखत आहे. Covid-19 च्या चाचण्या आता कोल्ड स्पॉटस म्हणजे जिथे करोनाचा एकही रुग्ण नाहीय अशा भागात सुरु करायची योजना आहे. भारतात ७२० असे जिल्हे आहेत, जिथे अजून एकही करोना व्हायरसचा रुग्ण सापडलेला नाही.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!