नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले असून समाजातील नोकरदार, मजूर , शेतकरी, आणि उद्योग वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मोदी सरकार पुन्हा देशातील उद्योजकांना दिलासा देण्यासाठी दुसरंं आर्थिक पॅकेज देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
कोरोनाच्या संकटात उद्योगांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच दिलासादायक पॅकेज जाहीर करणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तेलंगणातील उद्योग व वाणिज्य सदस्यांशी झालेल्या संभाषणादरम्यान गडकरींनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, येत्या 2 ते 3 दिवसांत सरकार मदत पॅकेज जाहीर करेल. सरकारला आपल्या मर्यादा आहेत. प्रत्येकाला वाचवण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे.
नितीन गडकरी हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) खात्याचे मंत्रीदेखील आहेत. ते म्हणाले की, एमएसएमई मंत्रालयाने वित्त मंत्रालय व पंतप्रधान कार्यालया(पीएमओ)ला आपल्या शिफारसी पाठवल्या आहेत. लघु उद्योगांना वेळेवर थकबाकी परतावा मिळावा आणि त्यांच्या व्यवसायात अडचणी येऊ नयेत, यासाठी केंद्र सरकार 1 लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेजवर काम करत असल्याचंही गेल्या महिन्यात नितीन गडकरींनी सांगितलं होतं.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदी पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला सूचना देण्यास येणार आहेत. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. सोमवारीच पंतप्रधान मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी राज्या राज्यांमधील कोरोनाबाबत आढावा घेतला. यावेळी मोदींनी ग्रामीण भागाला वाचवा भविष्यात अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी ग्रामीण भागच कमी येणार आहे, अशा सूचना दिल्या. या बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी मागणी केली. यामध्ये पंजाब, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यांचा सहभाग होता. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय घेणार का ? तर मजुरांच्या स्थलांतरासाठी कोणती घोषणा करणार हे पाहणे औत्सुक्याचं असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कोरोनाच्या संकटकाळात मजुरांचे शोषण करू नये : राहुल गांधी
लॉकडाऊन वाढला तर ते अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरेल : आनंद महिंद्रा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

