नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोनाचा फटका हा सर्वात जास्त मजूर वर्गाला बसला आहे. त्यामुळे संकटकाळात कोणी मानव अधिकारांचे उल्लंघन करून मजूरांचे शोषण करू नये, असे ट्विट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. देशात लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
‘अनेक राज्यांकडून कामगार कायद्यात दुरुस्ती केली जात आहे. कोरोनाचे संकट गंभीर आहे व आपण सर्व त्याविरोधात लढत आहोत. मात्र कोरोनाच्या आडून कोणी मानवी हक्कांचे उल्लंघन करू नये, तसेच कामगारांची पिळवणूक करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नये. कामगारांसंबंधी जी मूलभूत तत्त्वे आहेत त्यात कोणालाही तडजोड करता येणार नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
अनेक राज्यों द्वारा श्रमकानूनों में संशोधन किया जा रहा है। हम कोरोना के खिलाफ मिलकर संघर्ष कर रहे हैं, लेकिन यह मानवाधिकारों को रौंदने, असुरक्षित कार्यस्थलों की अनुमति, श्रमिकों के शोषण और उनकी आवाज दबाने का बहाना नहीं हो सकता। इन मूलभूत सिद्धांतों पर कोई समझौता नहीं हो सकता।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 11, 2020
दरम्यान याआधीही राहुल गांधी यांनी आर्थिक पॅॅकेजबाबत प्रतिक्रिया दिली होती. आर्थिक पॅकेजची घोषणा केल्यास, पैसा खर्च केल्यास रुपयाची अवस्था गंभीर होईल, अशी भीती मोदी सरकारला वाटते. मात्र सरकारला आता जोखीम स्वीकारावी लागेल. कारण शेवटच्या घटकापर्यंत पैसा पोहोचायला हवा. सरकार जितका जास्त वेळ विचार करेल, तितका आपला वेळ वाया जाईल, अस राहुल गांधी यांनी म्हंटल होत.
दरम्यान जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 42 लाखांवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदी पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला सूचना देण्यास येणार आहेत. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊन वाढला तर ते अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरेल : आनंद महिंद्रा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

