Share

‘रेमडेसिवीर इंजेक्शन कंपन्यांना महाराष्ट्राला साठा देऊ नये म्हणून केंद्राने धमकावले’

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. देशात दररोज १ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारडून कडक निबंध देखील लागू केलेले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जीवनावश्यक वस्तू वगळता उर्वरित दुकानेही बंद ठेवण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.

देशात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे.या पार्श्वभूमीवररुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी भटकत असून त्याचा काळाबाजार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंत्री नवाब मलिकांनी ट्विट करत, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारलं असता त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधं पुरवू नका असं सांगितल्याचा खळबळजनक दावा केला आहे. जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं पुरवली तर त्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!