Share

‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती घराघरात आणि मनामनात साजरी करा’

Published On: 

मुंबई : २०२० हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जयंती महोत्सव आयोजित न करता उद्या एक ऑगस्ट रोजी साजरी होणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती घरच्या घरीच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून साजरी करावी, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

धनंजय मुंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जाग्या करत, २०२० हे वर्ष आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करत आहोत, यानिमित्ताने राज्य शासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे व खास जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्याचे राज्य शासनाने ठरवले होते.

‘दोन महिन्यात येणार, आठ महिन्यात येणार असे म्हणत-म्हणत भाजपची पाच वर्षे निघून जाणार’

परंतु जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाने या सर्व संकल्पनाना बंधन घातलं आहे. हे बंधन शरीराला असू शकतं, पण मनाला नाही! अण्णाभाऊ साठे यांचे विचार त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून अजरामर झालेले आहेत. त्यामुळे यंदाची जन्मशताब्दी विशेष जयंती आपण घराघरात आणि मनामनात साजरी करूयात, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.

आपण सर्व जण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे अनुयायी म्हणून, आपल्या, आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावर्षीची जयंती घरच्या घरीच अण्णा भाउंच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरी करू. कुठेही कोरोनाविषयक नियमांचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन आपण सर्वांनी अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतींना उजाळा द्यावा, त्यांना अभिवादन करावे असे धनंजय मुंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीच्या पूर्व संध्येला केलेल्या आवाहनात म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीसांना झालंय तरी काय, प्रत्येकवेळी चुकीचा मुहूर्त काढताहेत- हसन मुश्रीफ 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!