🕒 1 min read
वैजापूर : वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे अवैधरित्या विक्रीसाठी आलेल्या गव्हास जागरूक नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आले आहे. नमुना घेतलेला गहु हा पुरवठा विभागातून शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यासाठी रेशन दुकानदाराला देण्यात आला होता. हा गहू रेशनचाच असल्याचा खुलासा झाला आहे. याप्रकरणी रेशनच्या धान्याची काळेबाजारी करणार्या रेशन दुकानदार शरद डघले याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी आहे की, सोमवारी (दि.१५) दुपारी कोल्ही गावातील रहिवासी असलेले भाऊसाहेब कदम हे तालुक्यातील शिऊर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आपल्या वैयक्तिक कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एमएच २० ई जी ७२२४ या वाहनात रेशनचा गहू अवैध मार्गाने आल्याची माहीत मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करुन त्यांनी वैजापूर तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागास ही माहिती दिली.
शिऊर कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये हा गहू विकला जाणार होता, परंतु जागरूक नागरिकाची भूमिका बजावत भाऊसाहेब कदम यांनी बाजार समितीतील व्यापाऱ्यांना गहू खात्री करून घ्यावी असे सांगितले. त्याचवेळी शिऊर पोलिसही घटनास्थळी पोहचले व तेथे गहू घेऊन उभ्या असलेल्या वाहनास पोलीसांनी ताब्यात घेतले. तसेच उपस्थित असलेल्या पुरवठा विभागाचे निरीक्षक बहुरे यांना वाहनात असलेल्या गव्हाचे नमुने घेतले. घेतलेल्या नमुन्याचा अहवाल आल्यावर सत्य समोर आले.
मिळालेल्या अहवालानुसार पुरवठा विभागातून रेशन दुकानदारास देण्यात आल्याचे समोर आले. हा गहू रेशनचा असल्याचे समोर आले असता पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार मनोहर वाणी यांनी दिलेल्या फिर्यादनुसार धान्याची काळाबाजारी करणाऱ्या रेशन दुकानदार शरद डघले विरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार कलम ३ व ७ अन्वये शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांची डोळ्यांची भाषा अन् उद्धव ठाकरेंनी घेतली फिरकी
- शहराचा पाणी प्रश्न सुटला?
- ‘१ मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल’
- चंद्रकांत दादा, ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है! हसन मुश्रीफांचा इशारा
- दहशतवादी ज्या मलाला युसूफझाईला ठार मारू इच्छितात तिच्याबद्दल तुम्हाला ‘हे’ माहिती आहे का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

