Share

ममता बॅनर्जींच्या सूनेला CBIची नोटीस

Published On: 

कोलकत्ता : पश्‍चिम बंगालमध्ये साधारण एप्रिलदरम्यान विधानसभा निवडणूक लागण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकीच्या तारख्या येत्या आठवड्यात जाहीर होतील अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे. जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत तसे तसे पश्‍चिम बंगालमधील राजकीय वातावरण तप्त असल्याचे चित्र दिसत आहे.

भाजपकडून मागील काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधण्यात येत आहे. आता सीबीआयने कोळसा घोटाळा प्रकरणी ममता बॅनर्जींचा पुतण्या अभिषेक बॅनर्जीच्या पत्नीला नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

भाजप सातत्याने अभिषेक बॅनर्जीला निशाणा करत आहेत. कोळसा घोटाळा प्रकरणी कोळसा माफियांशी अभिषेक बॅनर्जीची पत्नी रुजिरा बॅनर्जीचा संबंध असल्याचा आरोप करत सीबीआयने नोटीस पाठवली आहे. सीबीआयचे एक पथक अभिषेक बॅनर्जीच्या घरी नोटीस देण्याकरिता गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयची टीम अभिषेक बॅनर्जीच्या घरी पोहोचले तेव्हा घरी कोणीही नव्हते. या टीममध्ये ५ अधिकाऱ्यांचा समावेश होते. घरी कोण नसल्याने पथकाने दरवाजावर नोटीस लावली आहे. तसेच नोटीसमध्ये फोन क्रमांक नोंदवण्यात आला आहे.

तसेच त्यावर संपर्क साधण्यासही सांगितले आहे. कोळसा घोटाळ्यामध्ये रुजिरा बॅनर्जीचा कोळसा माफियांशी संबंध असल्याचा संशय असल्यामुळे सीबीआय चौकशी करणार आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये सतत्याने खटके उडत असतात. आतापर्यंत कम्युनिस्ट आणि तृणमूलने पश्‍चिम बंगाल हातातून जाऊ दिले नाही. त्यामुळे आता भाजपला तिथे यश मिळवता येणार का? भाजपला आजपर्यंत पश्‍चिम बंगालमध्ये कमळ फुलवण्यात यश आले नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपचे प्रयत्न सुरू असतानाच अमित शहांनी जे भाकीत वर्तवलं ते सत्यात उतरणार का? याची उत्सुकता सर्वांना आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!