Share

पोलिसांवर दबाव आणून प्रकरणे दाबली जात आहेत : फडणवीस

Published On: 

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील एक २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत.

काही ऑडिओ क्लिप्स फिरत आहेत. मात्र, या प्रकरणी राज्य सरकार आणि पोलीस पूजा चव्हाण प्रकरण दाबतायेत अशी राज्याचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी सणसणीत आरोप केले आहेत. पूजा प्रकरण सीबीआयकडे सरकारनं द्यायला हवं का याबाबत विचारलं असता फडणवीसांनी जोरदार टीका केली. हे सरकार पोलिसांवरच इतका दबाव आणून प्रकरण दाबतंय. ते सीबीआयकडे काय देणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात मीडियाशी बोलताना स्पष्ट केले आहे.

तसेच फडणवीस म्हणाले, राज्यपालांनी एकही असंवैधनिक कृत्य केलेलं नाही. तसेच राज्याचं सरकार सारं काही स्वत:च्या मालकीचं असल्यासारखं वागतंय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मोठे आरोप केलेत. पोलिस कुठल्यातरी दबावाखाली कारवाई करत आहेत. तसेच माहिती लपवली जाते आहे, असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी याआधी देखील केले होते.

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील एक २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण असलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे याआधी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!