नाशिक- सोयाबिनच्या बियाण्यांबाबत कृषी विभागाकडे राज्यभरातून सुमारे ५० हजार तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ७० टक्के तक्रारींची पडताळणी केली असून यंदा प्रथमच बियाणे उत्पादकांवर गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या खरीप पेरणी आणि कोरोनाबाबत आढावा बैठक काल नाशिकमधे भुसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यानंतर भुसे यांनी बातमीदारांशी संवाद साधला. सोयाबिन बियाण्याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन राज्य शासनानं कडक कारवाई केल्यानंतर काही कंपन्यांनी बियाणं बदलून देण्याची तयारी दर्शविली आहे.
महाबीजच्या बियाण्याबाबतही तक्रारी आल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाचं संकट असल्यामुळे कृषी विभागाला मिळणारा निधी कमी-जास्त होऊ शकतो, पण कृषी विभागाच्या योजना कमी होणार नाहीत.फळबाग लागवड, ठिबक सिंचन, शेततळं तयार करणं, अस्तरीकरण आदी विविध योजना सुरूच राहतील, असे भुसे यांनी सांगितलं.आकाशवाणीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्यानंतर सचिन पायलट यांनी सोशल मिडिया बायोमध्ये केले ‘हे’ बदल
आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो, गोपीचंद पडळकर झाले ट्रोल
..तर पुढच्या निवडणुका एकत्र लढवू, शरद पवारांचे संकेत
सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

