राजस्थान: राजस्थानातील कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची आज उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती रणदिपसिंह सुरजेवाल यांनी दिली आहे. तसेच पायलट यांच्याकडे जी खाती आहेत ती ही काढून घेण्यात आली आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले काही वेळापूर्वी पायलट यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी राजस्थानातील कॉंग्रेसच्या बहुसंख्य आमदारांनी केली होती.
गेले २ दिवस राजस्थानमध्ये राजकीय नाट्यानंतर सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करत काँग्रेसने कारवाई केली आहे. तर, आता पक्षातून देखील त्यांची हकालपट्टी गेली जाऊ शकते अशी चर्चा असतानाच सचिन पायलट यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. ते म्हणतात, “सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं.” त्यामुळेच आता पायलट भविष्यात काय राजकीय भूकंप आणतात हे पाहणं महत्वाचं असून राजस्थान सरकारबाबत खूप मोठी अस्थिरता निर्माण होत आहे.
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद आणि दीर्घकाळ राहिलेल्या राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून काँग्रेसने हटवल्यानंतर त्यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर काही तात्काळ बदल केलेत. यामध्ये त्यांनी आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये उपमुख्यमंत्री असल्याचं लिहिलं होतं, तसंच राजस्थान राज्याचे प्रदेशाध्यक्ष असल्याचंही नमूद करण्यात आलेलं. मात्र आता सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदाची असलेली ओळख आता मिटवून टाकली आहे.
दरम्यान, पायलट यांची हकालपट्टी केल्यानंतर सुरजेवाला म्हणाले, “सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि विश्वेंदर सिंह आणि रमेश मिना यांना मंत्रिपदावरुन तात्काळ काढलं जात आहे. राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदावर राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंदसिंह यांची नियुक्ती करण्यात येते. ते शेतकरी पुत्र असून त्यांनी शेतीच्या मशागतीसोबतच काँग्रेसची देखील मशागत केली. ते जिल्हाध्यक्ष पदावरुन इथपर्यंत आले आहेत.”
राजस्थानात या सर्व घडामोडी घडत असताना आणखी एक धक्का कॉंग्रेसला बसला आहे. पायलट यांच्या गच्छंतीसोबतच राजस्थानात आज आणखी एक प्रमुख राजकीय घडामोड घडली. काँग्रेसला पाठिंबा देत असलेल्या भारतीय ट्रायबल पार्टीच्या दोन आमदारांनी आपला पाठिंबा मागे घेतला असून यातील एकाने काँग्रेसतर्फे आपल्याला ओलीस ठेवण्यात आल्याचा दावा केला आहे.भारतीय ट्रायबल पार्टीचे दोन आमदार कमी झाल्याने आता गेहलोत यांच्याकडे १०० आमदारांचे पाठबळ उरले आहे. गेहलोत यांना सत्तेत राहायचं असल्यास त्यांना १०१ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या-
रिअलमीने भारतात आणला नवीन ‘स्वस्त’ स्मार्टफोन
आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो, गोपीचंद पडळकर झाले ट्रोल
..तर पुढच्या निवडणुका एकत्र लढवू, शरद पवारांचे संकेत
सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

