Share

Career Guide | पब्लिक रिलेशन (PR) मध्ये कसे बनवायचे आपले करिअर? जाणून घ्या!

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: सर्वांना आपल्या करिअरची काळजी असते या काळजीतून मग अनेकदा आपण विविध स्पर्धांचा सामोरे जातो. आपल्याला एखाद्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्या क्षेत्राविषयी जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. सध्या करिअरच्या नवनवीन वाटा खुल्या होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाने प्रगती केल्याने संपर्क ठेवण्यासाठी सोशल मीडिया हे माध्यम सर्वाधिक वापरले जाते. सोशल मीडिया असले तरी  राजकारण, समाजकारण, अर्थकारण या क्षेत्रांंमध्ये जनसंपर्क (पब्लिक रिलेशन PR) महत्त्वाचा मानला जातो. पब्लिक रिलेशन हे देखील करिअर करण्यासारखे क्षेत्र म्हणून सध्या आघाडीवर आहे. अनेक ठिकाणी तर आता पब्लिक रिलेशन कंपन्या देखील स्थापन झाल्या आहेत. अशात मग या पब्लिक रिलेशनमध्ये कशा पद्धतीने करिअर करता येईल तेच आपण जाणून घेऊयात.

पब्लिक रिलेशन चे योग्य ते शिक्षण घ्या 

पब्लिक रिलेशनशिकवणाऱ्या संस्थेत बेसिक पद्धतीने शिक्षण घेणे ही या करिअरकडे जाण्याची पहिली पायरी असते. काही संस्था फक्त पब्लिक रिलेशन शिकवण्यासाठी विशेष वर्गांचे आयोजन करतात. काही जागी विशेष पद्धतीचे कोर्सेस देखील घेतले जातात. ज्यांच्या माध्यमातून तुम्ही पब्लिक रिलेशन क्षेत्राला ओळखू शकता. पब्लिक रिलेशन मध्ये करिअर करण्यासाठी तुम्ही कोणत्याही विषयामध्ये पदवीधर असलात तरी चालते.

पब्लिक रिलेशन कंपनी सोबत काम करा 

एखाद्या नामांकित पीआर कंपनीसोबत तुम्ही इंटर्नशीप करणार असाल तर तुमच्या पब्लिक रिलेशनमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही त्या कंपनीच्या ग्राहकांशी भेटू शकता आणि कंपनीतील उच्च पदस्थांसोबत पब्लिक रिलेशनचे काम कशा पद्धतीने चालते हे देखील पाहू शकता. थेट पब्लिक रिलेशन ग्राहकांशी संपर्क झाल्याने तुमच्या आत्मविश्वासात देखील वाढ होते. परिणामी तुम्हाला या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव महत्त्वाचा असतो. पीआर एक्सपर्ट्स सोबत तुम्ही इंटर्नशीप करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ शकता.

लिखानावर भर द्या 

लिखाण हे पब्लिक रिलेशनमध्ये सर्वात अधिक महत्त्वाचे आहे. लिखाणाच्या जोरावर पब्लिक रिलेशनला अधिक महत्त्व प्राप्त होते. परिणामी पब्लिक रिलेशन मध्ये करिअर करायचे असल्यास लिखाणाची जास्तीत जास्त सवय असणे महत्त्वाचे आहे. पोस्ट, प्रेस नोट, जाहीरात, जाहीरनामा, टॅग्स, अशा पद्धतीचे  लिखाण पब्लिक रिलेशनमध्ये करावे लागते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!