टीम महाराष्ट्र देशा: आजकाल डोकेदुखी ही सामान्य समस्या समजली जाते. कारण डोकेदुखीचा त्रास कधीही कुठे आणि कुणालाही होऊ लागतो. वृद्धांबरोबरच लहान मुलांना देखील या समस्याला सामोरे जावे लागते. कारण डोकेदुखी कोणत्याही कारणामुळे होऊ शकते.
डोकेदुखी ची कारणे
- शरीराला पाण्याची कमतरता भासू लागली की डोकेदुखी सुरू होते.
- डोक्याला ताण दिल्यावर तणाव निर्माण होतो आणि त्या तणावामुळे डोकेदुखी निर्माण होऊ लागते.
- शरीराला पुरेशा प्रमाणात झोप न मिळाल्यामुळे सुद्धा डोकेदुखी ची समस्या निर्माण होऊ शकते.
- त्याउलट शरीराला जास्त झोप दिल्यामुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते.
- धूम्रपानामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्याचबरोबर डोकेदुखीच्या समस्याला सुद्धा तोंड द्यावे लागते.
- खूप जास्त थकवा आल्यामुळे सुद्धा आपले डोके दुखू लागते.
- डोळ्यावर जास्त ताण पडल्यास डोळ्याच्या थकव्यामुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते.
- उन्हात फिरल्याने किंवा सूर्यप्रकाशाच्या खूप वेळ संपर्कात आल्यामुळे सुद्धा डोके दुखायला लागते.
- त्याउलट थंड वाऱ्यामुळे सुद्धा डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.
डोकेदुखी साठी सोपे घरगुती उपाय
साधे पाणी
शरीरामध्ये पाण्याची समस्या निर्माण झाल्यावर शरीर डीहायड्रेट होते आणि अचानक तुमचे डोके दुखायला लागते. शरीराला मुबलक प्रमाणात पाणी दिल्यास डोकेदुखीच्या समस्या तुम्ही मात करू शकता.
लिंबूपाणी
पोटात गॅस निर्माण झाल्यामुळे डोकेदुखी होत असेल तर लिंबू पाण्याचे सेवन करा. लिंबू पाण्यामध्ये चमचाभर काळे मीठ टाकून पील्याने तुम्हाला लवकर बरे वाटेल. आणि तुमची डोकेदुखी दूर होईल.
मालिश
डोकेदुखी पासून सुटका मिळवण्यासाठी ‘हेड मसाज’ हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. कारण जेव्हा तुमचे डोके दुखते तेव्हा डोक्याला मालिश केल्याने तणाव आणि चिंता दूर होऊन डोक्याला आराम मिळायला लागतो.
चहा
डोकेदुखीवर चहा हा एक उत्तम पर्याय आहे. तुमचे डोके दुखत असल्यास चहामध्ये आले आणि इलायची यांचा समावेश करा, त्यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल.
वाफ
पुदिन्याच्या तेलाची वाफ किंवा विक्स ची वाफ घेतल्याने डोकेदुखी पासून तुम्हाला आराम मिळू शकतो. किंवा तुम्ही फक्त साध्या पाण्याची वाफ घेतली तरी तुम्हाला बरे वाटू शकते.
टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis | उद्धव ठाकरेंनी आपले शब्द मागे घ्यावेत, जाहीर माफी मागावी-देवेंद्र फडणवीस
- Travel Guide | ‘हे’ 5 हिंदी भाषिक देश फिरण्यासाठी ठरतील सर्वोत्तम ठिकाणं
- Narayan Rane । उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवरील मेळावा म्हणजे तमाशाकारांचा मेळावा; नारायण राणेंचा घणाघात
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा पक्षप्रमुखाबरोबरच पक्षाध्यक्षाचाही दावा
- Narayan Rane । “उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे, त्यानं…”; नारायण राणेंची जीभ घसरली


