अबुधाबी :आयपीएल 2021 मध्ये शनिवारी संध्याकाळी पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव करत आयपीएल 2021 च्या प्लेऑफ शर्यतीतून बाद केले. सामन्यात पंजाब किंग्जने विरोधी संघासमोर कमी धावांचे लक्ष ठेवले होते मात्र, हैदराबादसमोर 126 धावांचे लक्ष्यही जड होते. सामन्यानंतर हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने निकालाबद्दल निराशा व्यक्त केली.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हैदराबादने वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डर (3/19) च्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पंजाबला 7 विकेटवर 125 धावाच करू दिल्या. त्यानंतर त्याने कमी धावसंख्येचा सामना रोमांचक बनवल्याबाबदल होल्डरला धन्यवाद दिले, ज्याने 29 चेंडूत पाच षटकारांसह नाबाद 47 धावा केल्या, पण होल्डर आपल्या संघाला विजयाकडे नेऊ शकला नाही आणि 5 धावांनी पराभूत झाला.
आता सनरायझर्स हैदराबाद संघ या हंगामाच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. पराभवानंतर कर्णधार केन विल्यमसन म्हणाला, ‘मला वाटते की गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी उत्तम कामगिरी केली. खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण होते. आम्ही सामना बंद करण्याचा प्रयत्न करत होतो. जेसन होल्डरचा उत्तम प्रयत्न. हे सत्र अत्यंत निराशाजनक होते. पूर्वार्धातून आपण काही धडे घ्यायला हवे होते.
या मोसमात हैदराबादचा स्टार सलामीवीर आणि माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरची बॅट चालली नाही आणि त्याचा फटका त्याच्या संघाला सहन करावा लागला. हैदराबादने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांपैकी फक्त 1 सामना जिंकला आहे आणि ते केवळ 2 गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीची विजयी घोडदौड सुरूच; राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव
- कोल्हापुरात महापुराचा एक थेंबही महामार्गावर येणार नाही; गडकरींचा शब्द
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
