Share

ओबीसी आरक्षण रद्दचा परिणाम; जिल्हा परिषदेवर येणार प्रशासकीय राज

Published On: 

औरंगाबादः ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचे पडसाद येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या निवडणूकींवर पडतांना दिसत आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. मात्र ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा थेट परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर होत आहे. निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्हा परिषदेला मुदतवाढ देण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच निवडणूका लांबल्या तर जिल्हा परिषदेवरदेखील प्रशासक राज येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

शुक्रवारी औरंगाबाद जिल्हा परिषदेत कोरोनाचे कारण सांगत स्थायी समितीने जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाला मुदतवाढ देण्याचा ठराव संमत केला. हा ठराव शासनाला पाठवला जाणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता, जिप निवडणूक वेळेत होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे २१ मार्चपर्यंत नवीन अध्यक्षांची निवड न झाल्यास प्रशासक नियुक्त होण्याची शक्यता आहे. औरंगाबादमधील जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाची मुदत २१ मार्च २०२२ रोजी संपणार आहे.

त्यामुळे या मुदतीआधी निवडणूक होणे अपेक्षित आहे. ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषद गटांची संख्या वाढवली आहे. त्यानुसार, औरंगाबाद जि.प. गटाची संख्या ६२ वरून ७० झाली. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच ओबीसी प्रवर्गाला राजकीय आरक्षण देणारा अध्यादेश रद्द केला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय कोणत्याही निवडणूक घेऊ नका, अशी भूमिका घेतल्याने जिल्हा परिषद निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!