Share

जनावरांची गणना होते, मग आम्हाला ही मोजा- छगन भुजबळ

Published On: 

पुणे : पुण्यात महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलत असतांना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना करण्याच्या मुद्दावर भाष्य केले. जनावरांची गणना होते. मग आम्हाला ही मोजा, अशी मागणी करत केंद्र सरकारमुळेच ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भुजबळांनी केला आहे.

यावेळी बोलत असताना भुजबळ म्हणाले की,’आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी जनगणना झालीच पाहिजे. जनावरांची गणना होते. इथे आम्हाला मोजा. हात वर करुन इथं ठराव करा, ओबीसी जनगणना झालीच पाहिजे.’ तसेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्यामुळे आरक्षण मिळालेले लोक या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहत नाहीत, याच दुःख होतं, अशी सल त्यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’केंद्र सरकारला ओबीसींची जनगणना करायला त्यावेळी आम्ही भाग पाडले. परंतु केंद्रात भाजपचं सरकार येताच ओबीसींचा डाटा द्यायला नकार घंटा सुरू झाली. केंद्राच्या या आडमुठ्या भूमिकेमुळेच ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं. तरीही भाजपचे लोक ओबीसी जनजागरण मोर्चा काढताहेत. हा निव्वळ दुटप्पीपणा आहे.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!