Share

मंत्रीमंडळ बैठकीत दूध उत्पादक व व्यापाऱ्यांसाठी झाला महत्वपूर्ण निर्णय

Published On: 

मुंबई – गेले महिनाभर कोरोनामुळे सर्व व्यवसाय, उद्योग बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे नुकसान होत आहे. अशातच शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे.

सद्या हॉटेल्स ते चहा चे स्टॉल्स सर्वच बंद आहे. यामुळे दुधाच्या मागणीवर परिणाम झाला होता. त्यामुळे अतिरिक्त दुधाचे काय करायचे असा प्रश्न दूध उत्पादक कंपनींवर आला आहे. दरम्यान, दूध मागणी घटल्याने शेतकरी देखील चिंतीत होते. मात्र, आजच्या निर्णयाने काही अंशी दिलासा मिळणार आहे. चार कोटी लिटर दुधाचे रूपांतर भुकटीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

तसेच लॉक डाऊन मुळे व्यापार, उद्योग ठप्प असल्याने व्यापाऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले होते. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीय या काळात बाजारात तेजी असते मात्र सर्वच उलाढाल थांबल्याने नुकसान निश्चित झाले आहे. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाला दिलासा देण्यासाठी जीएसटी कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करणार असल्याच्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी केलेलं ट्विट,

“मंत्रिमंडळ बैठकीमधील निर्णय:

४ कोटी लिटर दुधाचे रुपांतर भुकटीत करून दुध उत्पादकांना दिलासा.
कोविडच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाला दिलासा देण्यासाठी जीएसटी कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करणार.”

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!