Share

‘सुखोई’तून प्रवास करून प्रतिभाताईंनी महिलांपुढेच नाही तर देशापुढे आदर्श निर्माण केला : उद्धव ठाकरे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रपती म्हणून सर्व सुख-सोयी पायाशी लोळण घेत असताना आवाजाच्या वेगापेक्षा वेगवान असणाऱ्या ‘सुखोई’तून प्रवास करायला धाडस लागते. ते धाडस प्रतिभाताईंनी दाखवून महिलांपुढेच नाही तर देशापुढे आदर्श निर्माण केला, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते.

यावेळी ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कन्या राष्ट्रपती होणार असतील तर त्यांच्या आड शिवसेना येणार नाही आणि कुणालाही येऊ देणार नाही अशी खंबीर भूमिका तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. अशी भूमिका जाहीर केल्यावर तेव्हाही शिवसेनेवर दबाव होता. मात्र कितीही मतभिन्नता असली तरी राज्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. या भावनेतून प्रतिभाताईंचे समर्थन केल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच प्रतिभाताईंचा सत्कार करण्याची मुख्यमंत्री म्हणून आपणास संधी मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मुख्यमंत्री नसतो तरीही या कार्यक्रमाला आलो असतो, कारण प्रतिभाताईंशी माझ्या आजोबांपासूनचे ऋणानुबंध आहेत. मध्यंतरी भेटी झाल्या नाहीत तरी ते नाते घट्टपणे जपले गेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी शरद पवारही उपस्थित होते. ते म्हणाले की, भैरोसिंह शेखावत यांच्या जनसंपर्कासमोर प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदासाठी लढा देऊ शकतील असे सोनिया गांधींना सांगितलं आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभाताईंना मिळाला अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली. प्रतिभाताईंना पाठिंबा देण्यासाठी आम्ही बाळासाहेबांच्या भेटीला गेल्यावर त्यांनी कोणतीही चर्चा करण्याचे कारण नाही, असे सांगून महाराष्ट्राच्या कन्या असलेल्या प्रतिभाताईंना बिनशर्त पाठिंबा दिला. बाळासाहेबांनी पाठिंबा दिलेल्या दोन व्यक्ती प्रतिभाताई आणि प्रणव मुखर्जी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशस्वी झाल्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महत्वच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1207627865451163649?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1207626136328392704?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!