नवी दिल्ली: कोरोना काळात मंदावलेला वाहन उद्योग पुन्हा गतिमान झाल्या नंतर यावर्षी अनेक वाहन कंपन्या आपल्या अनेक प्रसिद्ध एसयूव्हीचे अपडेट मॉडेल सादर करणार आहे. यात महिंद्रा स्कॉर्पिओ आणि महिंद्रा एक्सयूव्ही 500 चाही समावेश आहे. हे मॉडेल डिजाइन आणि फीचर्स अपडेट करून भारतीय बाजारात दाखल होणार आहेत.
आता ग्राहकांना लवकरच भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही KUV100 कार खरेदी करता येणार आहे. महिंद्रा लवकरच आपली ही खास एसयूव्ही लाँच करू शकते. ही एसयूव्ही कार सिंगल चार्जमध्ये 147 किमी धावू शकते. याबद्दल अद्याप कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
या एसयूव्हीत केबिन प्री-कूलिंग, फुल टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, कनेक्ट कार फिचर, रिमोट डायग्नोस्टिक्स, लोकेशन ट्रॅकिंग तसेच स्टीयरिंग माऊंट ऑडिओ कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहे. तसेच यात मॅन्युअल वातानुकूलन रिमोट आणि सेंट्रल लॉक सारखेही फीचर्स दिले आहेत.
ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑटो एक्सपो 2020 मध्ये सादर करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, यात 15.9 किलोवॅटची लिक्विड कुल मोटार देण्यात आली आहे. जी 120 एनएम टॉर्कसह 54 पीची पॉवर जनरेट करते. 80 टक्के चार्ज होण्यासाठी ही एसयूव्ही फक्त 50 मिनिटांचा वेळ घेते, असा कंपनीने दावा केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच’ चिघळलेल्या आंदोलनावर बॉलिवूड लेखकाचं ट्वीट
- ‘महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन, अरे कुठे फेडाल ही पापं?’
- ‘प्रबोधनकारां’चा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक – अजित पवार
- जनतेशी मनमोकळा संवाद साधताना धनंजय मुंडे झाले भावूक
- ‘रोज वचवच करणारे संजय राऊत दिल्ली घटनेवर का बोलले नाहीत?’

