Share

पूजा चव्हाण प्रकरणातील अरुण राठोडच्या घरी चोरी, लाखोंचा मुद्देमाल लंपास

Published On: 

बीड : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्यभरात सध्या चांगलेत चर्चेत आहे. यातील अरुण राठोड आणि कथित मंत्री संजय राठोड यांच्या ऑडिओ संभाषण व्हायरल झाल्याने प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. यामुळे पूजा चव्हाण प्रमाणेच अरुण राठोड हे नाव देखील चर्चेत आले आहे. या अरुणच्या संदर्भात आणखीन एक गोष्ट घडली आहे. त्याच्याच घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, अरुण राठोड आणि त्यांचे कुटुंब धारावती तांडा परळी येथे गेले होते. ते आज सोमवारी घरी आल्यानंतर त्यांना एकच धक्का बसला. घराच्या गेटचे लॉक तुटलेले होते. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले त्याच्या कुटुंबीयांना दिसले. कुटुंबीयांनी घराची झाडाझडती घेतल्यावर घरातून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. येत्या २५ तारखेला अरुणच्या बहिणीचे लग्न आहे. याची तयारी करण्यासाठीच घरात लाखोंचा ऐवज ठेवण्यात आला होता, अशी माहिती राठोड कुटुंबियांनी दिली.

अरुण राठोड हा युवक परळी शहराजवळच्या धारावती तांडा येथील रहिवासी आहे. पूजा चव्हाण हे प्रकरण चर्चेत आल्यापासून अरुण राठोड याचे कुटुंब घरी नव्हते. ते आज सकाळी घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देत श्वानपथकालाही पाचारण केले. दरम्यान मी व माझे पती दोघेही आजारी असल्याने दवाखान्यात होतो, असे अरुणच्या आईने सांगितले. तसेच अरुण कुठे आहे? याची माहिती आपल्याला नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!