Share

बाटलीबंद पेयजलावर ISI चिन्हाचा गैरवापर करणाऱ्या कंपनीवर भारतीय मानक ब्युरोचा छापा

Published On: 

मुंबई – मुंबई येथील BIS अर्थात भारतीय मानक ब्यूरोने 09 सप्टेंबर 2021 रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे भारतीय मानक 14543 नुसार बाटलीबंद पेयजलावर  ISI चिन्हाचा गैरवापर तपासण्यासाठी सक्तीचे छापे आणि जप्तीची कारवाई केली. मेसर्स मदर बेव्हरेजेस, (युनिट 10 ते 16, स्वामी विवेकानंद अपार्टमेंट, टेमघर पाइपलाइन रोड, भिवंडी -421302, ठाणे), च्या आवारात टाकलेल्या छाप्यात भारतीय मानक ब्युरोच्या प्रमाणित चिन्हाचा (आयएसआय मार्क) गैरवापर आढळला.

मेसर्स मदर बेव्हरेजेस, वैध परवान्याशिवाय आणि CM/L.No-7200168205 आणि CM/L.No-3723560 सारखे विविध परवाना क्रमांक वापरून ZIP Aqua, Oxy Clear, Reeha, ZEF Aqua, OXYREO या ब्रँडचे सीलबंद पेयजल BIS चिन्हाचा गैरवापर करून विकत असल्याचे आढळले. या छाप्यात भारतीय मानक 14543: 2016 नुसार 1 लीटरच्या सुमारे 360 बाटल्या आणि 500 मिलीलिटरच्या 852 बाटल्या तसेच विविध प्रकारचे लेबल/स्टिकर्स जप्त करण्यात आली.

बीआयएस मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या पथकात  अर्जुन.टी आणि  निशिकांत सिंह या क वर्गाच्या शास्त्रज्ञांचा समावेश होता. भारतीय मानक ब्यूरो कायदा 2016 नुसार भारतीय मानक ब्यूरोच्या मानक चिन्हांचा गैरवापर केल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान 2,00,000 रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. या गुन्ह्यासाठी न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.

अनेकदा असे आढळून आले आहे की बनावट आयएसआय चिन्हांकित उत्पादने ग्राहकांना मोठ्या नफ्यासाठी तयार करून विकली जातात. म्हणून, सर्वांना विनंती केली जाते की बीआयएस वेबसाइट http://www.bis.gov.in ला भेट देऊन किंवा बीआयएस केअर मोबाईल ऍप्लिकेशन वापरून खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावर आयएसआय मार्कची सत्यता पडताळून पाहा असं भारतीय मानक ब्युरोच्यावतीने आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!