मुंबई – सीबीआयचा एक गोपनिय अहवाल नुकताच माध्यमांपर्यंत पोहोचला. परंतु, या अहवालावर कोणतीही सही नव्हती. हा अहवाल कोणीतरी लीक केला होता. या अहवालात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सबळ पुराव्यांअभावी क्लिन चिट देत असल्याचा आशय होता. मात्र सीबीआयकडून याला कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आला नव्हता.
दरम्यान, तो अहवाल नेमका कुठून लीक झाला? याची चौकशी करण्यात आली. यात सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांनी हा अहवाल लीक केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकारी अभिषेक तिवारीला अनिल देशमुख यांच्याकडून Iphone12 ची लाच देण्यात आली होती असा दावा आता CBI ने केला आहे.
अभिषेक तिवारी अनिल देशमुख यांच्याविरुद्धच्या प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात पुण्यात गेले होते. ते वकील आनंद डागा यांनाही भेटले आणि माहिती देण्याच्या बदल्यात डागा यांनी त्यांना लाच म्हणून आयफोन दिला असल्याचं सांगितले जात आहे.
दरम्यान, देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि तिवारी हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं देखील सांगितले जात आहे. विशेष म्हणजे आनंद डागा यांचे आणि तिवारी यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा सीबीआयला संशय आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात भाजपला एका हाती सत्ता मिळणार; चंद्रकांत पाटलांना वाटतोय विश्वास
- इंधन दर कमी करण्याची किल्ली अजित पवारांकडेच आहे – चंद्रकांत पाटील
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश

