अहमदनगर : पक्षादेश झुगारून भाजपला मदत करणाऱ्या नगरमधील 18 नगरसेवकांची हकालपट्टी करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आल्याचं कळतंय. देशभरात भाजप विरोधी वातावरणात होत असताना नगरमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपला पाठिंबा देण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या प्रकरणाची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे.
अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडणीमध्ये भाजपच्या खेळीमुळे सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला सत्तेपासून दूर राहावं लागणार आहे. महापौरपदाच्या निवडीत राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीची भाजपसोबत छुपी युती असल्याचा संदेश गेला होता.
दरम्यान, पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी सांगूनही स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र आता अहवालाची देखील वाट न पाहता कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
