🕒 1 min read
उस्मानाबाद : केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकार मध्ये सध्या ‘टोळी युद्ध’ सुरू असल्याचा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला आहे. त्यांनी शनिवारी उस्मानाबाद येथे जागर एफ आर.पी. चा आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी ऊस परिषद घेतली. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला.
राज्य सरकार केंद्र सरकारच्या मंत्राला अटक करते तर केंद्र सरकारने राज्यातील एका मोठ्या वजनदार नेत्यांच्या नातेवाइकांच्या घरावर धाडी टाकत टोळी युद्ध सुरू केले. सर्व सामन्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास मात्र, कोणालाही वेळ नसल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. केंद्र तसेच राज्य सरकार हे जनतेचा प्रश्न निर्माण झाला की, खोटे-खोटे भांडण करुन जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केला.
गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचेच नाही तर जमिनीचेही प्रचंड नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केलेली नाही. यावरही राजू शेट्टी यांनी टोला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांशी संबंधित आयकर विभागाच्या छाप्यांचा भाजपाशी संबंध जोडणे हास्यास्पद – पाटील
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची दलित संघटनांची मागणी
- उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
- बीडच्या नुकसानग्रस्तांची स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी घेणार भेट
- आयकर विभागाच्या छाप्यांबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा; केशव उपाध्ये यांची मागणी


