Share

वेटिंग पिरियडमध्ये देखील महिंद्रा ‘थार 2020’च्या ६५०० युनिट्सचं बुकिंग

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोरोना आणि त्यामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र अनलॉक नंतर उद्योगांना चालना मिळाल्या नंतर आता वाहन उद्योग देखील धावत आहे. यामध्ये वाहनांचे नवनवीन मोडेल्स विकसित झाले असून ते लवकरच बजारात येत असून या वाहनांच्या बुकिंग साठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याच दिसून येत आहे.

भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी त्यांची लोकप्रिय एसयूव्ही महिंद्रा ‘थार 2020’ भारतात लाँच केली होती. या ‘सेकंड जनरेशन महिंद्रा ‘थार2020’ ची किंमत 9.8 लाख रुपयांपासून सुरु होते. तर महिंद्रा थारचे एलएक्स ट्रिम हे टॉप मॉडेल 13 लाख रुपयांपर्यंत बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. मोठा वेटिंग पिरियडही आहे. तरी देखील डिसेंबरमध्ये या कारच्या 6500 युनिट्ससाठी बुकिंग्स करण्यात आल्या आहेत.

महिंद्राच्या या सेकेंड जनरेशन थारसाठी (लाँचिंगपूर्वीच 9000 बुकिंग्स आल्या होत्या. दरम्यान, ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर महिंद्रा थारला सुरक्षिततेच्या बाबतीत 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. ग्लोबल NCAP ‘सेफ कार फॉर इंडिया’ क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार रेटिंग दिलं आहे तसेच मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीतही या कारला 4 स्टार्स मिळाले आहेत. क्रॅश टेस्ट रिपोर्ट पाहिल्यानंतर या कारला ग्राहकांकडून अधिक पसंती, मिळू लागल्याचे बोलले जात आहे.

सेकंड जनरेशन महिंद्रा थार मध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2.0 लीटर 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन, 150 बीएचपी पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते. तर, 2.2 लीटर डिझेल इंजिनने 130 बीएचपीची पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट केले जाते. या नव्या ‘थार 2020’मध्ये बीएस 6 इंजिन देण्यात आले असून, 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सेकंड जनरेशन महिंद्रा थारच्या उर्वरित वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, 9 वेरियंटसह रेड रेज, गॅलेक्सी ग्रे, मिस्टिक कॉपर, रॉकी बेज, नेपोली ब्लॅक आणि अ;ॅक्वामरीन या वेगवेगळ्या रंगात ‘थार2020’ लाँच केली गेली आहे. त्याचबरोबर महिंद्रा ‘थार 2020’मध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट, अ;ॅडजेस्टेबल सीट, रूफ माउंट स्पीकर्स, क्रूझ कंट्रोल, ड्युअल एअरबॅग, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, एबीएस, ईबीडी, हिल कंट्रोल, डिजिटल ओडोमीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, असे फीचर्स देण्यात आले आहेत. महिंद्रा ‘थार 2020’मध्ये खास चौकोनी एलईडी टेललाईट्स, स्पोक अ;ॅलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

तर प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. आता सरकारनेही इलेक्ट्रिक कारच्या विक्रीला चालना देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा अधिक विचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर आपापल्या एसयूव्ही प्रकारच्या वाहनांच्या निर्मितीवर लक्ष देणार आहे. यासाठी कंपनीने नुकतच विदेशी कंपनी अमेरिकेतील फोर्ड मोटर बरोबरचा आपली भागीदारी रद्द केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!