🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- अभिनेत्री प्रिया बापटचं नाव गेल्या दोन-तीन दिवसांपासून अचानक चर्चेत आलंय. त्याला कारण ठरलंय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेबसीरिजमधलं प्रियाचं एक-दीड मिनिटाचं ‘ते’ दृश्य. या बोल्ड दृश्याचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय.
या सीरिजमध्ये प्रिया पूर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारत आहे. नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजला राजकारणाची पार्श्वभूमी आहे. प्रिया बापटनं अभिनेत्री गीतिका त्यागीसोबत दिलेल्या लेस्बियन चुंबन दृश्यामुळे सोशल मीडियात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओची तुफान चर्चा होत आहे.
या दृश्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच प्रियाची चर्चा होताना दिसत आहे. प्रियाचा हा बोल्ड अंदाज काहींना आवडला असून काही प्रेक्षकांनी प्रियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. प्रिया हिने आपल्या चौकटीतून बाहेर पडल्याबद्दल अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे. तर अशी दृश्य आपल्या संस्कृतीत बसत नाहीत, असं म्हणून काही नेटकऱ्यांनी आपली नाराजी दर्शवली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

