Share

बीएमडब्ल्यू एम 1000 आरआर भारतात लॉन्च ! जाणून घ्या किंमत

Published On: 

मुंबई : जगभरात सध्या प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमती यावर वाहन खरेदी करणाऱ्या लोकांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांचा तर 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच कार्रात असून यामध्ये इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर यांचा समावेश आहे. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.

यामध्ये बीएमडब्ल्यू मोटोर्डने भारतात आपली नवीन एम परफॉरमन्स व्हेरियंट फ्लॅगशिप स्पोर्टबाईक एम 1000 आरआर लॉन्च केली आहे. स्टँडर्ड एम 1000 आरआरची किंमत 42 लाख रुपये इतकी आहे. कंपनीने या बाईकचं स्पेक व्हेरिएंटदेखील सादर केलं आहे. एम 1000 आरआर Competition ची किंमत 45 लाख रुपये इतकी आहे. रेकॉर्डच्या बाबतीत पहिल्यांदाच, बीएमडब्ल्यू दुचाकीवर एम ट्रीटमेंट मिळत आहे. अन्यथा ती फक्त बीएमडब्ल्यू स्पोर्ट्स कारसह दिली जाते.

बीएमडब्ल्यू एम 1000 आरआरचे अनेक फीचर्स बीएमडब्ल्यू एस 1000 आरआरमधून घेण्यात आले आहेत. 999 सीसी वॉटर / ऑइल कूल्डमध्ये एस 1000 आरआर इंजिनवर आधारित 4 सिलेंडर इनलाइन इंजिन देण्यात आले आहे. इंजिनमध्ये आपल्याला 212 एचपी उर्जा आणि 113 एनएम पीक टॉर्क मिळेल. एम आरआर स्प्रिंट्स अवघ्या 3.1 सेकंदात 100 किमी प्रति तास इतका वेग घेते. या बाईकचं टॉप स्पीड 306 किमी प्रति तास इतकं आहे.

या बाईकच्या इतर फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास यात बीएमडब्ल्यू शिफ्टकॅम टेक्नॉलॉजी, फ्लेक्स फ्रेम, रायडिंग मोड्स रँड रोड, डायनॅमिक आणि रेस, ऑप्शनल रायडिंग मोड्स दिले आहेत जे राइडिंगचा अनुभव अधिक शानदार बनवतात. बीएमडब्ल्यू एम 1000 आरआरमध्ये मल्टीफंक्शनल इन्स्ट्रुमेंट पॅनर, प्यूर राईड, कोर राइड डिस्प्ले, मल्टी कंट्रोलर आणि इतर फीचर्स आहेत. M RR ऑप्शनल M कॉम्पिटिशन पॅकेजसह येते ज्यामुळे रेसट्रॅक ओरिएंटेड कॅरेक्टर प्राप्त होतं. इतर मोटारसायकलींप्रमाणेच, बीएमडब्ल्यू मोटोर्ड पोर्टफोलिओ देखील 3 वर्षाच्या वॉरंटीसह येईल. त्याच वेळी, आपल्याला पॅकेजमध्ये 5 वर्षाची एक्सटेंडेड वारंटी आणि रोडसाइड असिस्टन्सदेखील मिळतो. बीएमडब्ल्यू मोटोर्ड इंडिया ही नवीन स्पोर्ट बाईक पूर्ण बिल्ट अप युनिट म्हणजेच सीबीयू असेल. ही बाइक गुरुवारपासून सर्व बीएमडब्ल्यू मोटोर्ड इंडिया डीलरशिप्समध्ये उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!