Share

कंगनाला मुंबई महापालिकेची नोटीस

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतवरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. उद्या म्हणजेच ९ सेप्टेंबर रोजी कंगना मुंबईत येणार आहे. त्यापूर्वी मुंबई महापालिकेने कंगनाला नोटीस पाठवली आहे.

महापालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या मुंबईतील कार्यालयाबाहेर नोटीस लावली आहे. कंगनाने त्याठिकाणचे काम त्वरित बंद करावे अशी नोटीस याठिकाणी लावण्यात आली आहे. परिसरात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा आरोप मुंबई महापालिकेने केला आहे . महापालीच्या नोटिशीनंतर कंगनाने ट्विट करून तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहे.

‘माझ्या सोशल मीडियावरील मित्रपरिवाराकडून टीका सहन करावी लागल्यानंतर बीएमसीने माझ्या कार्यालयावर बुलडोझर घेऊन न येता त्यांनी त्याठिकाणी सुरू असलेले लिकेजचे काम थांबवण्याची नोटीस लावली आहे.मला कदाचित जास्त धोका आहे पन तुम्हा सर्वांकडून अफाट प्रेम आणि आधार मिळाला " असे ट्विट कंगनाने केले आहे.

दरम्यान केंद्राकडून कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. कंगना मुंबईत दाखल होण्याआधी तिची बहीण आणि पीए कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच महापौर केशरी पेडणेकर यांनीहि कंगनाला कायदेशीर क्वारंटाईन करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कंगना मुंबईत परतल्यानंतर तिच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी म्हणून भाजपची उच्च न्यायालयात धाव

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!