नांदेड:- बहुजनांचे नेते अशी ओळख असलेले भाजप नेते नागनाथ घिसेवाड यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भोकर तालुक्यात मोठा जनाधार आणि कार्यकर्त्यांची फौज घिसेवाड यांच्या पाठीशी आहे. नागनाथ घिसेवाड यांच्या प्रवेशामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपण भोकरमध्ये पक्ष वाढीचे काम करणार असल्याचं नागनाथ घिसेवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
नागनाथ घिसेवाड हे नांदेड जिल्ह्यातील लोकप्रिय बहुजन नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. तब्बल दोन वेळा त्यांनी भोकर विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती, दोन्हीही वेळा अत्यल्प मताने त्यांचा पराभव झाला होता. येणाऱ्या काळात भोकर नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. घिसेवाड यांच्या पक्षांतरामुळे भोकरमध्ये काँग्रेसला स्पर्धकच शिल्लक राहिलेला नाही. बहुजनांचे नेते अशी ओळख असलेल्या घिसेवाड यांच्या प्रवेशामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे.
नागनाथ घिसेवाड यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्री अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. घिसेवाड यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे, ते कार्यकर्ते आता काँग्रेससाठी काम करणार आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्ष वाढीला मोठी मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये काम करायला सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र स्थानिक पातळीवर असणाऱ्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून ते आता काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- करी आपल्या एका दणक्यात बैलाला सरळ करू शकतो, हे तर केंद्रातील मोदी सरकार आहे’
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- ‘विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शिष्यवृत्ती व विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नाबाबत तातडीच्या उपाययोजना करा’
- ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात 14 डिसेंबरपासून होणार मोठा बदल
- ‘रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला भारदस्तपणा मिळवून देणाऱ्या अभिनेत्याला आपण मुकलो’

