🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भाजप समोरील विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचा मोठा प्रश्न सुटला आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या प्रविण दरेकरांची निवड करण्यात आली आहे. याबाबत थोड्याच वेळात औपचारिक घोषणा होणार आहे. सुजितसिंग ठाकूरांना मागे टाकत दरेकरांची विरोधी पक्षनेते पदासाठी बाजी मारली आहे.
भाजपमधील अनेक नेते विरोधी पक्षनेते पदाच्या स्पर्धेत होते. तर पंकजा मुंडे यांचे नाव देखील चर्चेत होते. तर शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी देखील विरोधी पक्षनेते पदावर आपलाचं अधिकार आहे, असा दावा केला होता. मात्र पक्षाने विरोधी पक्षनेते पदाची माळ प्रविण दरेकरांच्या गळ्यात घातली आहे.
दरम्यान प्रवीण दरेकर हे भाजपचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. मनसेमध्ये असताना दरेकर हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मनसेकडून निवडणूक लढताना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दरेकर यांचा मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला.त्यानंतर दरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवून आमदार केलं.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206435538820947968?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206429318361960448?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206422743878553600?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
