धनश्री राऊत : भाजपच्या यशात पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच सिंहाचा वाटा आहे तो पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा आहे. देशाच्या सर्व भागाचा केलेला अभ्यास, पूर्व तयारी, प्रचंड मेहनत आणि जोरदार प्रचाराच्या जोरावर शहा यांनी पुन्हा एकदा विजय साकारला. याच गुणांमुळे अमित शाह यांना चाणक्य म्हटलं जातं.
प्रत्येक निवडणूक ही जिंकण्यासाठी लढायची असती हा अमित शहा यांचा मंत्र आहे.निवडणूक जिंकण्याच्या नीतीमुळे अमित शहा यांना भाजपचे चाणक्य म्हंटल जात.वयाच्या १७ व्या वर्षीचं अमित शहा यांनी चाणक्य नीती वाचली होती. शहांच्या या चाणक्य नीतीमुळे भाजपला जल्लोषाची संधी मिळाली.मागील पाच वर्षात भाजपला जल्लोषाचे अनेक क्षण अनुभवण्याचे भाग्य भाजपला अमित शहा मुळे मिळाले. २०१४ मध्ये मिळवलेल्या यशाची पुनारावृत्ती २०१९ च्या लोकसभेत करण्यात अमित शहा यांनी यश मिळवलं. भाजपच्या विजयासाठी अमित शहा यांनी मोठी मेहनत घेतली.
अमित शहा यांनी लोकसभेच्या ३१२ मतदारसंघात दौरा केला.उमेदवारांसाठी १६१ जाहीर सभा,१८ रोड शो केले. शहा यांनी तब्बल देशभरात दिड लाख किलोमीटर चा प्रवास केला.पोलिंग एजंट ते पक्षाचा अध्यक्ष असा प्रवास शहा यांनी केला.भाजपला १० कोटी सक्रीय कार्यकर्त्यांचा पक्ष बनवण्याची किमया शहा यांनी करून दाखवली.भाजपला जगातील सर्वात मोठा पक्ष करण्यात शहा यांना यश आलं.
प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी मोठी तयारी करणारे अमित शहा यांनी निवडणुकीसाठी मित्रपक्षांशी जुळून घेतले. नाराज शिवसेनेसोबत पुन्हा युती करण्याचा निर्णय घेतला.नितीश कुमार यांना पुन्हा भाजप आणण्यात शहा यांना यश आले. काही राज्यात स्वबळ तर काही राज्यात मित्रपक्ष जोडले यामुळे अनेक राज्यात भाजपची सत्ता आली. अमित शहा याचं करिश्मायी नेतृत्व भाजपला यशाच्या शिखरावर घेऊन गेलं.अमित शहा यांना भाजपच चाणक्य का म्हटलं जाते ? हे पुन्हा एकदा देशाला आणि विरोधकाना समजलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

