टीम महाराष्ट्र देशा – राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु असताना शेजारील कर्नाटकात पुन्हा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील कॉंग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी भाजपचे नाराज आमदार आमच्या संपर्कात आहेत असं विधान केले आहे.
सतीश जारकीहोळी यांनी ‘भाजपाच्या काही असंतुष्ट आमदरांनी आमच्या हायकमांडशी संपर्क साधला आहे. आता पुढे काय होते हे पाहावे लागेल. काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आम्ही प्रत्येकाला पक्षात घेऊ शकत नाही किंवा सर्वांना सोडूही शकत नाही. हे विधानसभा मतदारसंघांच्या स्थितीवर अवलंबून असेल असं विधान केले आहे.
पुढे बोलताना जारकीहोळी यांनी आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवारी देऊ, अशी भाजपाच्या काही नेत्यांना अपेक्षा आहे. मात्र आपचा पक्ष निवडणुकीपूर्वी त्याबाबत विचार करेल. मी यासंदर्भात हायकमांडशी चर्चा केली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आता प्रचारात गुंतले आहेत असं विधान केले आहे.
दरम्यान, २०१८ च्या सार्वत्रिक निवडणूक भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. परंतु कॉंग्रेस आणि जेडीएस यांनी आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. परंतु काही महिन्यांपूर्वी भाजपने कॉंग्रेसला खिंडार पाडत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे जारकीहोळी यांनी हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1184009558739435520?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1184007313314570240?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1184001347017793541?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

