नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या विषाणूच्या विळख्यात अनेक नेते अडकले होते यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा देखील समावेश होता. भाजपच्या या या झुंजार नेत्याने अखेर कोरोनाला धोबीपछाड दिला आहे. शाह यांची कोरोना चाचणी आज ‘निगेटिव्ह’ आली आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्याने मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. २ ऑगस्टला शाह यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहीतीही त्यांनी ट्विटवरून दिली होती.
‘कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर मी चाचणी केली. यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. मी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहे. दरम्यान, या काळात माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वत:ला विलगीकरणात ठेवावे’, असे आवाहनही शाह यांनी टि्वटद्वारे केले होते. मात्र, आता शाह कोरोनामुक्त झाले आहेत.
Home Minister Amit Shah tests negative for #COVID19. pic.twitter.com/0ENSwRUqRh
— ANI (@ANI) August 14, 2020
आज अमित शहा यांनी ट्वीट करुन म्हटलं, ‘आज माझ्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मी परमेश्वराचे आभार मानतो आणि या काळात ज्यांनी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आता डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणार आहे.
‘वाढीव वीज बिल हा जनतेचा समज’ हे विधान म्हणजे सत्तेचा माज – भाजप
पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत : सत्यजीत तांबे
परवानगीविना रस्ता खोदणाऱ्या कंत्राटदाराला तुकाराम मुंढे यांनी घडवली चांगलीच अद्दल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

