Share

‘वाढीव वीज बिल हा जनतेचा समज’ हे विधान म्हणजे सत्तेचा माज – भाजप

Published On: 

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात कारखाने आणि घरगुती ग्राहकांना महावितरणने भरमसाठ बिले दिली आहेत. कोरोनाच्या महामारीतून अद्याप कारखाने आणि सर्वसामान्य माणूस बाहेर आला नाही. ही वाढीव बिले कमी करून आकारण्यात यावीत अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे.

याच मुद्द्यावरून आता भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा वीज बिलांच्या सवलती बाबतचा कुठलाही निर्णय झाला नाही त्यामुळे ठाकरे सरकार हे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ अशाप्रकारचे असल्याची टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे म्हणतात, की वाढीव वीज बिल हा फक्त लोकांचा भ्रम आहे हे त्यांचे वक्तव्य म्हणजे सत्तेचा माज आला असल्याचे लक्षण आहे. अख्ख्या महाराष्ट्रात आणि मुंबईत वाढीव वीज बिलांमुळे लोक त्रस्त झालेली आहेत, नागपूरमध्ये एकाने वाढीव वीज बिलामुळे आत्महत्या केल्याची घटना घडलेली असताना सुद्धा राज्याचे ऊर्जामंत्री अशी बेमुर्वतखोर विधानं करतात हे अत्यंत संतापजनक आहे.300 युनिटपर्यंत वीज बिलं माफ करा अशी भाजपाची पहिल्या दिवसांपासूनची मागणी आहे, ती पूर्ण होईपर्यंत आंदोलन करत राहू असेही आ. भातखळकर यांनी म्हटले आहे.

हसतमुख, दिलदार, लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख सदैव स्मरणात राहतील

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे राष्ट्रवादीने फुंकले रणशिंग; पदाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश

राज्यात गोरगरिबांकरीता पॅकेज जाहीर करण्यासाठी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव आणावा-भाजपा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!