Share

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप निवडणूकीच्या रिंगणात : दिपक चव्हाण

Published On: 

करमाळा – शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, करमाळा बाजार समिती मध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी भाजप बाजार समिती निवडणूक लढविणार असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दिपक चव्हाण यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितले.

राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून सर्व सामान्य शेतकऱ्यांना प्रथमच बाजार मतदानाचा अधिकार मिळाला असून भाजप सरकारने दिलेला मतदान अधिकाराचा नक्कीच फायदा थेट शेतकऱ्यांना होणार असून कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे दिपक चव्हाण यांनी सांगितले.

आतापर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांना तुरीचे हमीभाव तसेच सर्वोदय शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून आणि श्रीराम दुध संघात नाबार्ड कडून दुध उत्पादकांसाठी सबसिडी निर्माण करून दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वास असून बाजार समिती निवडणूकीत आपला विजय पक्का असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आता चौरंगी लढत

भाजप निवडणूक लढविणार असल्याचे चर्चा तालुकाभर सुरू झाल्याने पाटील-बागल-जगताप-शिंदे गटात खळबळ उडालेली आहे. याअगोदर पाटील-जगताप गट एकत्र येऊन निवडणूक लढविणार हे स्पष्ट झालेले होते. बागल गट आणि शिंदे गट स्वबळावर लढणार असून ही निवडणूक तिरंगी होणार असे बोलले जात होते परंतु भाजप कुठल्याही परिस्थिती मध्ये निवडणूक लढणार असल्याने आता ही निवडणूक चौरंगी होणार असे सध्यातरी चित्र आहे.

५४ उमेदवारी अर्ज दाखल

दरम्यान करमाळा बाजार समिती निवडणूकीसाठी १८ जागांसाठी शनिवार ११ अॉगस्ट पर्यंत ५४ उमेदवारी अर्ज दाखल झालेले असून १३ अॉगस्ट सोमवारी उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण राज्यात अव्वल

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!