Share

आमचा आवाज दाबण्याचा भाजपचा प्रयत्न, पण आम्ही या दबावाला बळी पडणार नाही – जयंत पाटील

Published On: 

मुंबई : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार त्यांना 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

परब यांच्यासह शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या देखील ईडीच्या रडारवर आहेत. ईडीचे धाड सत्र सुरु असून अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी यांच्यासह एकनाथ खडसे या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. या सर्व घडामोडींवरून भाजपवर महाविकास आघाडीतील नेते आरोप करत असून केंद्र सरकारच्या मदतीने ईडीचा गैरवापर केलं जात असल्याचं म्हटलं जात आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी हे सर्व आवाज दाबण्यासाठी केलं जात असल्याचा आरोप केला आहे. ‘महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांना नोटीसा पाठवल्या जात आहेत. हे भाजपचे राजकारण आहे. महाविकास आघाडीचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येते. खासदार भावना गवळी यांच्याकडे छापे पडले हे माझ्या कानावर आले आहे. पण महाविकास आघाडीचे नेते अशा प्रकारच्या दबावाला बळी पडणार नाही,’ असं देखील जयंत पाटील यांनी ठामपणे सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!