Share

याद रख सिंकदर के हौसले तो आली थे…जब गया था दुनिया से तो दोनो हात खाली थे…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. याद रख सिंकदर के हौसले तो आली थे…जब गया था दुनिया से दोनो हात खाली थे…अशा शब्दात भाजप सरकारला धनंजय मुंडेनी सुनावले.

धनंजय मुंडे म्हणाले, भाजपची अवस्था सिंकदर प्रमाणे झाली आहे. तो जग जिंकत गेला.पण त्याने एक चुक केली.जिंकलेले राज्य सांभाळण्याची व्यवस्था केली नाही. त्याप्रमाणेच भाजप आज एक एक राज्य जिंकत तर आहे, पण राज्य कसे चालवावे? हे त्यांना कळत नाही. म्हणूनच एक दिवस सिंकदर प्रमाणे भाजपला मोकळ्या हाताने जावे लागेल.

सरकारने केलेल्या कर्जमाफी संदर्भात बोलतांना मुंडे म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत. आमचा बाप आत्महत्या करताना आम्ही पाहू शकत नाही. कर्जमाफी झालेला एकही शेतकरी सापडत नाही, अशा शब्दांत  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळीची जाहीर झालेली मदत तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा कोणताही प्रश्न मोठा नाही. त्यामुळे आपण अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करावी, अशी मागणी धनंजय मुंडेनी सभागृहात केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!