नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी रोज नवे खुलासे होत असताना बिहारमध्ये भाजपच्या वतीने सुशांतसिंह प्रकरण हा निवडणुकीच्या मुद्दा होत असल्याचे दिसत आहे. यावर आता काँग्रेस नेते अधीर चौधरी यांनी भाजपवर टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर निशाणा साधला आहे. याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘सुशांतसिंह राजपूत हा देशाचा अभिनेता होता. मात्र भाजपाने निवडणुकीत फायदा करून घेण्यासाठी त्याला बिहारी अभिनेता करून टाकलं’ असं म्हटलं आहे. तसेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडीलही आपल्या मुलांसाठी न्याय मागण्यास पात्र आहेत, सर्वांसाठी न्याय हे आपल्या राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे. रियाचे वडील हे निवृत्त लष्करी अधिकारी असून त्यांनी देशाची सेवा केली असं देखील चौधरी यांनी म्हटलं आहे.
सुशांतसिंहच्या छायाचित्राखाली ना भुले है! ना भुलने देंगे! अशी घोषणा लिहिलेले स्टीकर बिहारमध्ये काही ठिकाणी झळकत आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून ती २९ नोव्हेंबरच्या आधी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास हा विषय आता राष्ट्रीय पातळीवरही गाजत आहे व राजकारणाचा विषय झाला आहे.
Departed star, Mr #SushanthSinghRajput was an Indian actor, BJP turned him into a Bihari actor, only to score electoral brownie points, #SushantSinghRajputCase
(1/n)— Adhir Chowdhury (@adhirrcinc) September 9, 2020
महत्वाच्या बातम्या


