Share

राफेलची हवाई दलात अधिकृतपणे ‘एण्ट्री’

Published On: 

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात अधिकृतपणे समावेश होणार आहे . फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबाला एअरबेसवर हा सोहळा पार पडणार आहे. पार्ली यांचा 2017 नंतरचा हा तिसरा हिंदुस्थान दौरा असेल. फ्रान्स आणि हिंदुस्थानचे मैत्रीचे संबंध आणखी दृढ होण्यासाठी त्यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

राफेल’च्या समावेशाबरोबरच, पारंपरिक सर्वधर्म पूजा, राफेल आणि तेजस विमानांसह ‘सारंग हवाई कसरत चमूचे’ हवाई प्रदर्शन यांचा कार्यक्रमात समावेश असेल. हा कार्यक्रम हवाई दलाच्या इतिहासातील ‘अतिशय महत्त्वाचा मैलाचा दगड’ ठरेल, असे हवाई दलाचा प्रवक्ता म्हणाला. फ्रान्सच्या ‘दसॉल्त अ‍ॅव्हिएशन’ कंपनीने तयार केलेली राफेल लढाऊ विमाने त्यांचे आकाशातील प्रभुत्व आणि अचूक हल्ले यांसाठी प्रसिद्ध आहेत.

फ्रान्समधून 29 जुलैला पाच राफेल लढाऊ विमाने हिंदुस्थानात दाखल झाली आहेत. ही विमाने गुरुवारी फ्लोरेन्स पार्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार सोहळ्यात हिंदुस्थानी हवाई दलाच्या सेवेत रुजू केली जाणार आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने पार्ली हिंदुस्थानचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत. सोहळ्यानंतर पार्ली आणि राजनाथ सिंह यांच्यात द्विपक्षीय संरक्षण संबंध तसेच सुरक्षा सहकार्याला आणखी बळकट करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

‘कुठल्याही टॉम , डिक आणि हारीने केलेल्या मुख्यमंत्र्यांचा अनादर स्वीकारणार नाही’

महाराष्ट्राची हि संस्कृती नाही : चंद्रकांत पाटील

सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश अनपेक्षित, धक्कादायक व आश्चर्यकारक! : अशोक चव्हाण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!