Share

जयंत पाटलांना मोठा धक्का, भाजपने फोडले पाच नगरसेवक

Published On: 

पनवेल : सध्या राज्यात फक्त रायगडमध्ये थोडंफार अस्तित्व उरलेल्या शेतकरी कामगार पक्षाला भाजपने सुरुंग लावला आहे, पनवेलमधील नगरसेवक हरीश केणी यांच्यासह पाच नगरसेवकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शेकापचे पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला अक्षरशः खिंडार पडले आहे. भाजप कार्यालयात दुपारी पाच नगरसेवकांचा प्रवेश होणार आहे. माजी पालमंत्री रवींद्र चव्हाण, रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, महेश बालदी उपस्थित राहणार आहेत. पनवेल महापालिकेत शेकापचे 23 नगरसेवक आहेत. यातील चौघा जणांनी आधीच शेकापला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेत भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.

‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत याची दक्षता घ्या अजित पवार यांचे आदेश

दरम्यान, हरीश केणी यांनी पक्ष सोडताना शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा जयंत पाटील आणि स्थानिक नेतृत्वावर जोरदार टीका केली. शेकापमध्ये पैसेवाल्याना पदे दिली जात असून फक्त कॉन्ट्रॅकरनाच न्याय दिला जात असल्याचा आरोप नगरसेवक हरीश केणी यांनी केला.

राष्ट्रवादीला मोठा धक्का, बड्या नेत्याचे कोरोनामुळे निधन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!