Share

मध्यप्रदेशातल्या भूकंपाचे धक्के महाराष्ट्रात जाणवणार का? काका जरा जपून… ; पवारांना टोला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – मध्यप्रदेशातलं काँग्रेसचं सरकार संकटात सापडलं आहे. काँग्रेस पक्षाच्या २४ आमदांरांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थनार्थ राजीमाने दिले आहेत. याच या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

मध्यप्रदेशातल्या भूकंपाचे धक्के महाराष्ट्रात जाणवणार का? काका जरा जपून…असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. भातखळकरांनी जणू काही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना इशाराच त्यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातल्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा हा पक्षासाठी नि:संशय मोठा धक्का आहे. त्यामुळं पक्षाचं नुकसान होणार आहे. ते टाळता आलं असतं का मला माहीत नाही, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसला आपले नेते सांभाळता येत नाहीत. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षात बंडखोरी होणार असल्याचं भाकीत आठवलेंनी रामदास आठवलेंनी व्यक्त केलं आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!