Share

‘आखिर तुम्हे आना है’ म्हणत भाजपने व्यंगचित्रातून लगावला शिवसेनेला टोला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना-भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण रंगले आहे. अशातच दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी एक व्यंगचित्र टि्वट करुन शिवसेनेला टोमणा मारला आहे. सत्ता स्थापनेच्या मुद्द्य्वरून दोन्ही पक्षाचे नेते व्यंगचित्राच्या माध्यमातून एकमेकांवर टोलेबाजी करताना दिसत आहेत. त्यातच शिवसेनेने आज मुख्यमंत्रिपदाच्या मागणीचा पुनरुच्चार केल्यानंतर बग्गा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात आम्ही सरकार स्थापन करु, असे विधान केल्यानंतर बग्गा यांनी राजकीय व्यंगचित्र टि्वट केले आहे. या ट्वीट मधील व्यंगचित्रात एक वाघ असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रिंगमास्टरच्या भूमिकेत दिसत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात वाघ ही शिवसेनेची ओळख आहे. या फोटोमध्ये फडणवीस यांच्या हातामध्ये एक रिंग असून ते आनंदी मूडमध्ये दिसत आहेत. शेवटी तुला यायचेच आहे, फक्त थोडा वेळ लागेल असा संदेशही या व्यंगचित्रावर लिहिण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाने अशा चित्रांच्या माध्यमातून परस्परांना परस्परांवर टोलेबाजी केली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र पोस्ट केले होते. ज्यात वाघाने एका हातामध्ये कमळ पकडले होते तर घडयाळ गळयामध्ये होते. कमळ भाजपाचे तर घडयाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने जो कौल दिलाय त्यामुळे सत्ता स्थापनेच्या चाव्या शिवसेनेच्या हातात असल्याचा संदेश राऊत यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1190257517420376064?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1190261225516519425?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!